महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) हे महाराष्ट्र सरकारचे एक स्वायत्त बोर्ड आहे. जे राज्यातील डिप्लोमा लेव्हल टेक्निकल एज्युकेशनशी संबधित बाबींचे नियमन करण्यासाठी अनिवार्य आहे. अभ्यासक्रम विकास, कोर्स इम्प्लेमेंतेसन कार्यक्रम, विद्यार्थी विकास उपक्रम, इंडस्ट्री- संस्था इंटरएक्सन, शैक्षणिक संस्थांची देखरेख, परीक्षा घेणे व निकाल लावणे, प्रमाणपत्र जारी करणे इत्यादी MSBTE चे महत्वपूर्ण कार्य आहेत.

  • MSBTE खालील गोष्टींवर विश्वास ठेवते:

  1.  उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्य विकास
  2. डिप्लोमा धारकांची औद्योगिक तयारी आणि सुधारित रोजगारक्षमता
  3. उद्योगाशी समन्वयवादी संबंध
  4. सर्व भागधारकांचा सामूहिक आणि सहकारी विकास
  5. सामाजिक विकासामध्ये तांत्रिक हस्तक्षेप
  6. एकसमान दर्जेदार तांत्रिक शिक्षणात प्रवेश

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाखांच्या विविध विषयाचे लेब मनुअल तयार करणे व ते संस्थाना वितरीत करणे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते प्रिंटेड पुस्तकाच्या स्वरुपात किंवा ऑनलाइन PDF फाईल मध्ये उपलब्ध होईल. 

  

                                          MSBTE Lab Manuals Download Here


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या सत्रापासून प्रथम वर्षाचे (सेम-१ आणि सेम-२) शिक्षण द्विभाषीय (bilingual) म्हणजेच इंग्लिश व मराठी भाषेतून होणार आहे. 

                त्याचप्रमाणे MSBTE विविध शाखांच्या विविध कोर्सेस साठी परीक्षा घेतांना प्रश्नपत्रिका तयार करते. त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी पाहता याव्या व प्रश्नाचा संदर्भ घेऊन परीक्षेची तयारी करता यावी यासाठी सर्व प्रश्नपत्रिका PDF फाईल मध्ये डाऊनलोड साठी उपलब्ध करून दिल्या आहेत.


                                            MSBTE Question Paper Download Now


        MSBTE चे एक महत्वाचे काम म्हणजे उत्तरपत्रिका तपासणे व त्यांनतर निकाल जाहीर करणे. उत्तरपत्रिका तपासण्या साठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांना प्रादेशिक उत्तरपत्रिका तपासणी केंद्र म्हणून नियुक्त केले जाते. उत्तरपत्रिका तपासतांना वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या गुण मूल्यांकनात तफावत येत असते व कमी अधिक गुण देण्यात येतात. या प्रक्रियेमध्ये विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. म्हणून MSBTE  विविध विषयाचे मॉडेल answer paper तयार करते व प्राध्यापकाना उपलब्ध करून देते जेणेकरून सर्वांचे गुण मुल्यांकन एकसुत्रीपणाने व्हावे आणि गुण मूल्यांकनात कोणतीही अडचण येऊ नये.

पुढे काही दिवसानंतर निकाल जाहीर झाला की मॉडेल answer paper MSBTE मार्फत विध्यार्थ्यासाठी PDF फाईल मध्ये उपलब्ध करून देते. जेणेकरून त्यांना आपला संपूर्ण अभ्यास यामधील उत्तराचा संदर्भ घेऊन करता येईल.


                                        MSBTE Model Answer Paper Download Now


विध्यार्थ्यांनी मॉडेल answer paper सर्च करण्यासाठी विषयाचा कोड टाकणे अनिवार्य आहे. त्यासाठी त्यांच्या syllabus मध्ये दिलेले विषय कोड माहिती करून घ्यावे.

अधिक माहितीसाठी MSBTE चे ओफिसिअल संकेतस्थळ आहे.