Talathi Bharti 2022 | तलाठी गट क संवर्गाची पदे भरण्यास मान्यता

            तलाठी गट क संवर्गाची पदे  भरण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. महारष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या संदर्भाधीन पत्रान्वये, तलाठी (गट क) च्या दिनांक ३१/०३/२०२० पर्यंत रिक्त असलेल्या पदांची सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकत्रितपणे प्राप्त झालेल्या vacancy matrix नुसार दिनांक २४/०३/२०२२ च्या पत्रानुसार १०१२ रिक्त पद भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून पुढील प्रक्रियेचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. 

3165 तलाठी पदे भरण्यास मंजुरी | पहिल्या टप्प्यात 1012 पदे भरणार !! खुशखबर


    पहिल्या टप्प्यातील पदाविषयी जिल्ह्यानुसार भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा सर्व उमेदवारांनी तलाठी पदभरती परीक्षेला लागावे.

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२२  

पदाचे नाव:- तलाठी

पदसंख्या:- ३१६५

पहिल्या टप्प्यात भरती:- १०१२

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा:- १८ ते ३८ वर्ष 

नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे